Friday, October 11, 2024
Homeजळगावतापी नदीला पूर ; हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडले

तापी नदीला पूर ; हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडले

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

येथून जवळच असलेल्या तापी नदी (Tapi River) वरील सर्वात मोठे धरण हतनुरच्या (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली.

- Advertisement -

रात्री 10 वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार धरणाच्या एकूण 42 दरवाजांपैकी 30 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडल्याने मोठ्या प्रमाणावर तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. यामुळे तापी नदीला मोठा पूर आला असून नदी दुधडी भरून वाहत आहे. या पावसाळ्यात तापी नदीला प्रथमच पूर आला असून काठावरील सर्व गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणामध्ये आजरोजी 62 टक्के जलसाठा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या