जळगाव jalgaon । प्रतिनिधी
ठेवीदारांच्या Of depositors हिताच्या आड लपून बीएचआर घोटाळ्यात In the BHR scandal सरकारला हाताशी धरून तपास यंत्रणा काही विशिष्ट लोकांना अटक करत असल्याचा आरोप चाळीसगावे आमदार मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavan यांनी जळगावातील भाजप कार्यालयात शनिवारी सायंकाळी 4 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत press conference केला.
दरम्यान या प्रकरणात आपला किंवा कुटुंबियांचा कुठलाही संबंध नसून नाहक माझ्याबद्दल खोटी व चुकीची माहिती प्रसारित केली जात असून राजकीय सुडातून मला अडकविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही आमदार चव्हाण यावेळी म्हणाले.माझ्याबद्दल खोटी पसरविली
बळीरामपेठेतील भाजपा वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आमदार मंगेश चव्हाण, अॅड. धनंजय डोके , भाजपचे प्रसिद्धी प्रमुख दीपक भांडारकर हे उपस्थित होते.
11 ऑगस्ट रोजी सुनिल झंवरच्या पोलिस कोठडीच्या निकालात माझ्या नावाचा कुठलाही उल्लेख नाही.असे असतानाही माझ्याबद्दल संभ्रम निर्माण होईल व खोटी माहिती पसरविण्यात आली. माझे किंवा माझ्या कुटुंबियांचे माझ्या कंपन्यांचे या प्रकरणाशी कुठलेही संबंध नाही. तसेच सुनील झंवर यांच्याशीही माझा कुठलाही व्यवहार झालेला नाही. मी 2012 साली दोन कोटी रुपयांचे बीएचआर पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. कायदेशीररीत्या व्याजासह मी ते संपूर्ण कर्ज त्याचवेळी फेडले आहे.
तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न नाही
त्यामुळे बीएचआर घोटाळा व सुनील झंवर यांच्यासंदर्भातील माझा संबंध जोडुन प्रसारित झालेल्या बातम्या निराधार असल्याचेही यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. बीएचआर घोटाळ्याची संपूर्ण देशभरात व्याप्ती आहे. असे असतानाही केवळ जळगाव शहरासह जिल्ह्यातील ठराविक लोकांनाच तपास यंत्रणेकडुन अटक केली जात आहे. ठेवीदारांच्या हिताच्या आड लपून काही विशिष्ट लोकांना अडकविण्याचा सरकार तपास यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहे. असाही आरोप यावेळी आमदार चव्हाण यांनी केला.
ठेवीदारांच्या हितास संदर्भातच मी आर्थिक गुन्हे शाखेच्या डीआयजीसह वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. त्याद्वारे तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा कुठलाही माझा प्रयत्न नसल्याचे स्पष्टीकरणही यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले.
मी, चौकशीला घाबरणार नाही
जर बीएचआर घोटाळा व झंवर यांच्याशी माझा काही संबंध आढळून आल्यास त्या पद्धतीनेही तपास यंत्रणेने तपास करावा. मी चौकशीला घाबरणार नाही. मी स्वतःच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन भेट देणार असून या गुन्ह़्यांबाबतचे तसेच ठेवीदारांच्या हितासाठी विविध प्रश्नांबाबत माहिती घेणार असल्याचेही यावेळी आमदार चव्हाण म्हणाले. लवकरात लवकर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात अशीही मागणी आ. चव्हाण यांनी बोलतांना व्यक्त केली.