तरसोद, ता.जळगाव –
येथील जिल्हा परिषद शाळेत दि.3 जानेवारी २०२० रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.
आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक उखर्डू चव्हाण व शिक्षक वृंदांनीक केले.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक उखर्डू चव्हाण, शिक्षक वृंद ईश्वर सपकाळे, रवींद्र उपाध्ये, विजय लुल्हे, मनोहर बावीस्कर, श्रीमती कल्पना तरवटे, निवृत्ती खडके यांनी परिश्रम घेतले.