Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजन‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई | Mumbai

प्लीफ सर्जरीमुळे जगविख्यात झालेल्या डॉ. पी.एस. रामाणी यांचे नाव, त्यांच्या संशोधनामुळे पाठीच्या कण्याशी कायमचे जोडले गेले आहे.

- Advertisement -

पाठीच्या कण्यामधील एका दोषावर त्यांनी शोधून काढलेल्या उपायाने हजारो रूग्णांना आजवर वेदनामुक्त केले आहे.

१६ ऑक्टोबर या ‘वर्ल्ड स्पाइन डे’चा मुहूर्त साधून डॉ. रामाणी यांच्या या संघर्ष व संशोधनावर आधारित ‘ताठ कणा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. स्वतः डॉ.प्रेमानंद रामाणी, चित्रपटाचे निर्माते विजय मुडशिंगीकर, करण रावत, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते, लेखक श्रीकांत बोजेवार तसेच डॉ. रामाणी यांची भूमिका साकारणारा अभिनेता उमेश कामत यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ झाला.

डॉ. रामाणी यांनी लहानपणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत विलक्षण कौशल्याने आणि बुद्धीने आपली वाटचाल केली. हे करीत असताना आपल्या सामाजिक दृष्टीचे भान जपत हजारो रुग्णांच्या वेदना कमी केल्या, अनेकांना जीवनदान दिले. त्यांचा हाच दृष्टीकोन आपल्याला ‘ताठ कणा’ या त्यांच्या १७ आवृत्त्या प्रकशित झालेल्या वाचकप्रिय आत्मचरित्रात्मक पुस्तकातूनही अनुभवायला मिळतो.

काही प्रमाणात या पुस्तकावर तसेच अन्य महत्त्वाच्या घटनांवर आधारलेला ‘ताठ कणा’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे. चित्रपटात डॉ. रामाणी यांची भूमिका अभिनेता उमेश कामत यांनी साकारली आहे.

‘डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे’, उमेशने यावेळी सांगितले.

‘ताठ कणा’ हा एक वेगळा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी ही आपल्यासाठी एका अजोड व्यक्तिमत्वाला जाणून घ्यायचा प्रवास असल्याचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितले.

तर, ‘चित्रपटरूपाने दाखविण्यात येणारा प्रवास माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे‘ असे डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी यावेळी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

झेडपी शाळांचा नवा विक्रम; 54 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवोदय विद्यालय समितीमार्फत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 18 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 25 मार्च रोजी लागला असून त्यात जिल्हा...