Thursday, January 8, 2026
Homeनगरझेडपीचे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

झेडपीचे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

14 प्राथमिक शिक्षकांसह एका केंद्र प्रमुखाचा समावेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या (Teacher Day) दिवशी उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad School) 14 प्राथमिक शिक्षक व एका केंद्र प्रमुखाचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने (Teacher Award) गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षीचे हे पुरस्कार जाहीर झाले असून मागील वर्षीचे आणि चालू वर्षीचे पुरस्कारांचे लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांची 100 परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी प्रश्‍नावली तयार करून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द कररण्यात येते. या पुरस्कारासाठी सहभागी होऊ इच्छिणार्‍या शिक्षक व केंद्र प्रमुखांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये स्वयंमूल्यमापन करुन प्रश्‍नावली जमा केल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्या मार्फत पडताळणी होऊन 3 शिक्षक (त्यामध्ये एक शिक्षिका) व एक केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठविणेत आले. त्यानंतर जिल्हा स्तरावरुन गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्र प्रमुख तालुके बदलुन यांच्या मार्फत पथक परीक्षण करणेत आले.

YouTube video player

त्याचप्रमाणे प्रस्ताव प्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेणेत आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (CEO Ashish Yerekar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होऊन त्यात 100 गुणांची प्रश्‍नावली व लेखी परीक्षेचे 25 गुण असे 125 गुणांपैकी ज्यांना सर्वात जास्त गुण मिळाले अशा प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक यांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्या मान्यतेसाठी पाठविणेत आला. त्यांच्या मान्यतेनंतर जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेल्या शिक्षक व केंद्र प्रमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त शिक्षक

पुष्पा शिवराम लांडे (पदवीधर, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा शिळवंडी, अकोले). संजय एकनाथ कडलग (उपाध्यापक जि. प. प्राथमिक शाळा सावरगाव तळ, संगमनेर). पितांबर मखमल पाटील (पदवीधर जि. प. प्राथ. शाळा दशरथवाडी, कोपरगाव). लिता सुभाषराव पवार (उपाध्यापिका, जि. प. प्राथ. शाळा गमेगोठा (केलवड), राहाता. योगेश भानुदास राणे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा शिरसगाव, श्रीरामपूर). सुनिल महादेव लोंढे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा, उंबरे राहुरी), सुनिल तुळसीराम आडसुळ (उपाध्यापक, जि. प. प्राथ. शाळा सोनवणेवस्ती नेवासा). गोरक्षनाथ भिकाजी बर्डे (मुख्याध्यापक, जि. प. प्राथ. शाळा कर्‍हेटाकळी, शेवगाव). नामदेव तात्याबा धायतडक (पदवीधर जि. प. प्राथ. शाळा सोमठाने नलवडे, पाथर्डी), बाळु गंगाराम जरांडे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा पवारवस्ती, जामखेड), दिपक प्रभाकर कारंजकर (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा मिरजगाव मुले कर्जत), स्वाती दिलीप काळे (उपाध्यापिका जि. प. प्राथ.शाळा पवारवाडी (अजनुज) श्रीगोंदा. प्रकाश सखाराम नांगरे (उपाध्यापक जि. प. प्राथ. शाळा सोबलेवाडी, पारनेर), वर्षा मोहन कचरे (उपाध्यापिका जि. प. प्राथ. शाळा शिंगवेनाईक अहमदनगर) आणि ज्ञानेश्‍वर रामकिसन जाधव (केंद्रप्रमुख दहिगांवने शेवगाव) यांचा पुरस्कारर्थीमध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...