Saturday, April 26, 2025
Homeक्राईमनिवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी चोरी

निवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी चोरी


पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

सोनोशी येथे निवृत्त शिक्षकाच्या घरी अनोळखी चोरट्यांनी घरफोडी (Burglary) करून तीन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भानुदास ज्ञानोबा दौंड हे निवृत्त शिक्षक सोनोशी येथे परिवारासह राहतात. गुरुवारी रात्री दौंड कुटुंबीय जेवण करून घरात झोपले होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भानुदास दौंड यांना जाग आली.

- Advertisement -

तेव्हा तीन अनोळखी चोरटे (Theft) घरातून पळत गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील गेटचे कुलूप तोडून तिघे चोरटे घरात शिरले होते. त्यानंतर कपाट व कोटीची उसकापाचं करून चोरट्यांनी (Theft) सोन्याचे झुंबर, वेल, नथ, गंठण पोत दहा हजार रुपये रोख व साडेतीन हजाराच्या दोन साड्या असा तीन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दौंड (Daund) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...