अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील दुसर्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतिक्षेत आहेत. मात्र, पवित्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले असून, आता व्यवस्थापनांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत. शिक्षण विभागाने पवित्र संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 1 हजार 2016 व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण 1337 जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र, बर्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी.