Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात शिक्षकपदाच्या २०६२ जागांच्या मुलाखतीसाठी 'इतक्या' उमेदवारांची शिफारस

राज्यात शिक्षकपदाच्या २०६२ जागांच्या मुलाखतीसाठी ‘इतक्या’ उमेदवारांची शिफारस

मुंबई | Mumbai

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात शिक्षण विभागात (Education department) लवकरच शिक्षक भरती होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विट (Tweet) करुन दिली आहे.

- Advertisement -

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, ‘पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!’

राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या (pavitra portal) माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डीएलएड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या