Saturday, October 5, 2024
Homeनगरआधी आंतरजिल्हा शिक्षकांना प्राधान्य द्या

आधी आंतरजिल्हा शिक्षकांना प्राधान्य द्या

पालकमंत्री विखे पाटील यांचे जिल्हा परिषदेला आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बाहेरच्या जिल्ह्यात वर्षानूवर्षे सेवा करून आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांना नगर जिल्हा परिषद प्रशासनाने नेमणुकीचे आदेश देतांना स्वतालुक्यासाठी प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. दरम्यान, आधी आंतरजिल्हा बदली शिक्षकांना संधी देवून त्यानंतर जिल्हातंर्गत शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया राबवावी, अशी आग्रही मागणी आ. सत्यजित तांबे यांनी यावेळी केली.

- Advertisement -

शनिवार जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. विधानसभेचे अधिवशेन सुरू असल्याने पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आ. राम शिंदे मुंबईतून, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. लहू कानडे, आ. रोहित पवार, आ. तांबे यांच्यासह कपिल पवार, विठ्ठल घोरपडे हे ऑनलाईन पध्दतीने तर नगरच्या मुख्यालयातून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, आ. किरण लहामटे, उपायुक्त पशूसंवर्धन डॉ. सुनील तंबारे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, जिल्हा अधीक्षके कृषी सुधाकार बोराळे यांच्यासह अधिकारी बैठकीत ऑनलाईन जोडले गेले.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची त्याच्या मूळ तालुक्यात नेमणूक देवून सोय करावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी लक्ष द्यावे. शिक्षणाधिकारी यांनी देखील आंतरजिल्हा शिक्षकांना प्राधान्य द्यावे. आंतरजिल्हा बदलीने 20 वर्षानंतर जिल्ह्यात बदलून येणार्‍या शिक्षकांची सोय होणार नसले, ते मानसिकदृष्ट्या स्थिर नसतील त्याचा गुणवत्तेवर परिणाम होईल, या शब्दात पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सुचना दिल्या. हाच मुद्दा पकडून आ. तांबे यांनी ही मागणी लावून धरत आंतरजिल्हा शिक्षकांची सोय करण्याची मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी येरकर यांनी पुढील आठवड्यात या शिक्षकांना तीन विकल्प देवून त्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शाळा खोल्यांसाठी 60 कोटी
जिल्हा नियोजन समितीमधून प्राथमिक शाळा खोल्या दुरूस्ती आणि बांधकामासाठी 50 कोटी रुपयांचा निधी आणि शिर्डी संस्थांचा 10 कोटी अशा प्रकारे शाळा खोल्यांसाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. यातून निर्लेख मंजूर झालेल्या शाळांना प्राधान्याने निधी देण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात शाळा खोल्या आणि अंगणवाडीसोबत महानगरपालिका हद्दीत सीसीटी टीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी मोठा निधी देणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

विकास कामांची पुस्तिका
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती पुस्तिका तयार करून प्रकाशित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनासह सर्व शासकीय विभागाने राबवलेल्या विविध योजनाची माहिती संकलित करून त्यातून महायुतीच्या सरकारच्या विकास कामाची आगळीवेगळी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

पाणी योजनांसाठी स्वतंत्र बैठक
यावेळी आ. राजळे आणि आ. तांबे, आ. तनपुरे यांनी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यावतीने राबवण्यात येणार्‍या जलजीवन योजनेचे नगर जिल्ह्यात काम असमाधानकारक असल्याचा आरोप केला. त्यावर पालकमंत्री विखे यांनी अधिवेशन संपल्यावर नगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच ठेकेदार प्रशासकीय यंत्रणेवर वरचढ ठरत आहेत आणि अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे कामे करत असल्याची नाराजी पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना जलजीवन योजनेच्या कामावरून आमदारांनी सुनावले. येरेकर यांनी योजनेच्या प्रगतीची माहिती यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या