Sunday, January 25, 2026
HomeनगरAhilyanagar : बाप्पा पावले; पावणे पाच हजार गुरूजींच्या कार्यमुक्तीचे आदेश निघाले !

Ahilyanagar : बाप्पा पावले; पावणे पाच हजार गुरूजींच्या कार्यमुक्तीचे आदेश निघाले !

8 सप्टेंबरनंतर हजर होता येणार बदलीच्या ठिकाणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या या शिक्षकांच्या मेलवर त्यांच्या बदलीचे आदेश धाडण्यात आले होते. मात्र, बदल्यांची प्रक्रिया झाली तरी बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त कधी करणार असा प्रश्न शिक्षकांसमोर असतांना गुरूवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने बदली झालेल्या शिक्षकांना 8 सप्टेंबरनंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना गणपतीबाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून शिक्षकांच्या बदल्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत सर्वात प्रथम संवर्ग एकमधील 863 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यामध्ये अपंग प्रमाणपत्र असणारे, दुर्धर आजाराने पीडित, घटस्फोटीत, अपंग विद्यार्थ्यांचे पालक असणार्‍या शिक्षकांचा समावेश असून या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया राबवण्यात आलेली असली ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार संबंधीत शिक्षकांची तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पडताळणी सुरू आहे.

YouTube video player

दरम्यान, संवर्ग दोनमध्ये 374, अवघड क्षेत्रात असणार्‍या 388 शिक्षकांच्या आणि त्यानंतर बदली पात्र असणार्‍या 3 हजार 95 शिक्षकांच्या अशा प्रकारे आतापर्यंत 3 सवंर्गातील 4 हजार 720 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या स्तरावरून बदलीचे ऑनलाईन आदेश पाठवण्यात आले होते. बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करणार असा प्रश्न बदली झालेल्या शिक्षकांना होता.

न्यायालयीन सुनावणी आणि अन्य कारणामुळे बदल्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतरही ग्रामविकास बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणार की नाहीत, असा प्रश्न जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये होता. मात्र, या शिक्षकांना गणपतीबाप्पा पावले बदली झालेल्या सर्व शिक्षकांना 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त होवून पुढील एका दिवसात बदल्याच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी काढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पावण पाच हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

निम्म्या जिल्ह्यात होणार उलथापालथ
नगर जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या एकूण प्राथमिक शिक्षकांची संख्या ही 11 हजारांच्या जवळपास आहे. यातील पावणे पाच हजार शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असून अद्याप बदलीमधील एकल शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार असून यामुळे बदली होणार्‍या शिक्षकांची संख्याही 5 हजार 500 पर्यंंत होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील जवळपास निम्म्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने...