Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लांबणीवर

मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लांबणीवर

मुंबई | Mumbai
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुक आणि शिक्षक पदवीधर संघाच्या निवडणुकीबाबत आत्ता महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेली निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदविधर यासोबतच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी ही निवडणुक जाहीर करण्यात आली होती. या चारही जागांवर येत्या १० जून रोजी मतदान तर १३ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार होती. शाळांमधल्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणुक घेण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करण्यात आली होती.

- Advertisement -

हे ही वाचा : विशेष ‘योग’ साधत PM मोदींनी वाराणसीतून केला उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान, निवडणुक आयोगाने यावर विचार करुन महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार ‘कुंभ कक्ष’; सिंहस्थ २०२७...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी आयोजनात युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतंत्र 'कुंभ...