Wednesday, July 24, 2024
Homeनगरशिक्षक मतदारसंघासाठी 13 हजार 587 अर्ज

शिक्षक मतदारसंघासाठी 13 हजार 587 अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे गुरूवारअखेर 13 हजार 587 मतदार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 9 हजार 559 पुरुष तर 4 हजार 18 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात कार्यरत शिक्षक संख्या 15 हजार 190 असल्याची माहिती निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली. यात पहिल्या टप्प्यातील शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून नोंदणी झालेल्या अर्जाची पडताळणीची मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारांसाठी माध्यमिक आणि महाविद्यालयातील शिक्षक मतदार होण्यासाठी पात्र आहेत. जिल्ह्यात माध्यमिक आणि महाविद्यालयांची संख्या 1 हजार 239 आहे. शिक्षणाधिकार्‍यांमार्फत सर्व शिक्षकांसाठी मतदार नोंदणी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. निवडणूक विभागाकडे 13 हजार 587 अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक 1 हजार 737 अर्ज प्राप्त झाले आहेत. जामखेड तालुक्यातून सर्वाधिक कमी 270 अर्ज प्राप्त झाले आहेत. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत संबंधित विद्यालयातील शिक्षकांचे एकगठ्ठा मतदार नोंदणी अर्ज तहसील कार्यालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तालुकानिहाय अर्ज

अकोले 974, संगमनेर: 11 हजार 737, राहाता : 1 हजार 182, कोपरगाव : 1 हजार 514, श्रीरामपूर : 809, नेवासे 822, शेवगाव : 680, पाथर्डी 864, राहुरी : 944, पारनेर : 583, नगर : 1 हजार 875, श्रीगोंदे : 743, कर्जत : 590, जामखेड : 270 असे अर्ज प्राप्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या