Sunday, May 26, 2024
Homeनाशिकशिक्षकांना मिळणार नियमित वेतन

शिक्षकांना मिळणार नियमित वेतन

नाशिक | Nashik

अनुदानाअभावी जुलै महिन्यापासून जिल्ह्यातील तीन शाळा व दहा तुकड्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन रखडले होते.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पाठपुराव्यामुळे ८३ कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, सर्वच शाळांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढेही जिल्ह्यातील सर्वच शाळांचे वेतन नियमित आणि वेळेवर होईल, असे वेतन पथकाचे अधीक्षक उदय देवरे यांनी सांगितले.

वेतनास विलंब झाल्याप्रकरणी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देवरे यांची भेट घेऊन गऱ्हाणे मांडले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि रजारोखीकरणाचे बिल अनुदानाच्या उपलब्धतेनुसार दिले जाईल.

सध्या डीसीपीएस टू एनपीएसचे काम चालू असून, ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. तीन हजार ३०० पैकी दोन हजार ८०० कर्मचाऱ्यांची माहिती प्राप्त झाली आहे. तर मेडिकल बिले व इतर बिले ही अनुदान उपलब्धतेनुसार प्राधान्य क्रमाने काढता येतील, असे देवरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनासह इतर प्रश्न माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्याशी चर्चा करून सोडविण्याची मागणी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, के. डी. वाघ, एन. वाय. पगार, बी. के. नागरे, राजेंद्र महात्मे, अनिल देवरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या