Wednesday, July 3, 2024
Homeनंदुरबारबारी येेथे एक लाखाचे सागवानी लाकूड जप्त

बारी येेथे एक लाखाचे सागवानी लाकूड जप्त

नवापूर – Navapur – श.प्र :

- Advertisement -

तालुक्यातील बारी येथे एका घरातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे सागवानी लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. याबाबत एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनविभाग शहादा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, वनपाल डी.के. जाधव, बी.एस.दराडे, के.एम.बडूरे, वनरक्षक एस.बी. गायकवाड, डी.डी.पाटील, एन.आर.पाटील, एस.ए.खैरनार, एस.डी.बडगुजर, आर. के.पावरा, के.एन.वसावे, एल.एस.पवार, ए.जी.पावरा, ए.बी.पावरा, ए. आर.वळवी, वाहन चालक चमार्‍या गावित व वनमंजूर अनिल गावित आदी वनकर्मचार्‍यांनी बारी गावात जाऊन आनंद पुन्या कोकणी याच्या घराची झडती घेतली असता, 44 साग नग कट साईज 1.180 घ. मि. माल मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत 1 एक लाख रुपये आहे.

सदर कारवाईत रेंज स्टाफ नवापूर चिंचपाडा, मधील वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वाहन चालक यांनी भाग घेतला. ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक धुळे दि. वा.पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, पी.के.बागुल, उमेश वावरे, विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या