Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडाIndia Vs South Africa: भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी

India Vs South Africa: भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी

मुंबई । Mumbai

सलग दोन महिने चाललेल्या आयपीएल (IPL) थरारानंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामान्यांचे पुनरागमन होत आहे. या आंतरराष्ट्रीय सामान्यांत भारतीय संघाला (Indian team) एक नवा इतिहास (History) घडवण्याची संधी मिळणार आहे…

- Advertisement -

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India & South Africa) यांच्यातील ५ सामन्यांच्या टी २० मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारताला दिल्ली (Delhi) येथे पहिल्या सामन्यात विजय संपादन करून एक नवीन इतिहास घडवण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाने (Indian team) सलग १२ सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( (India vs South Africa) पहिल्या टी २० सामन्यात विजय संपादन केल्यास सलग १३ सामने जिंकणारा पहिला टी २० संघ ठरणार आहे.

तर आयपीएल रणसंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी भारताने न्यूझीलंड ( New Zealand) वेस्टविंडीज (West Indies) आणि श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) ३ सामन्यांची टी २० मालिका ३ – ० अशा फरकाने जिंकली होती.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्षदिपसिंग (Arshdeep Singh) यांच्यासारख्या युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना देखील भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....