Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाINDvsAUS दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

INDvsAUS दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

दिल्ली l Delhi

शनिवारपासून(२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा झाली आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे प्रभारी कर्णधार असणार आहे.

- Advertisement -

या सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे दोन खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहेत. पहिल्या सामन्यात झालेला मानहानीकारक पराभवानंतर हा सामना जिंकण्याचं आव्हान घेऊन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयनं एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत विकेटकीपर असेल तर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं हे कसोटी पदार्पण असणार आहे.

असा असेल संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज

विराट कोहली, मोहम्मद शामीच्या अनुपस्थिती भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आवाहन आहे. अ‍ॅडलेड येथील प्रकाशझोतातील पहिल्या कसोटीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी क्रिकेटमधील भारताची नीचांकी धावसंख्या नोंदवली. त्यातच कोहली आता पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतला आहे. संघात जाडेजाच्या उपलब्धतेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झाली आहे. तरी देखील अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठीण असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. आगामी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या