Monday, June 24, 2024
Homeक्रीडाTeam India Squad : टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

Team India Squad : टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

'या' खेळाडूंना मिळाली संधी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आगामी टी २० विश्वचषकासाठी (T 20 World Cup) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये १५ खेळाडूंचा समावेश असून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आली आहे.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा केली असून यामध्ये काही नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. १ जूनपासून २०२४ पासून टी २० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार) यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

- Advertisment -

ताज्या बातम्या