मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या इंग्लंड दौऱ्यात एकूण ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स
दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, एजबस्टन, बर्मिंगघम
तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स, लंडन
चौथा सामना, 23 ते 27 जुलै, एमिरट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल, लंडन
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), यशस्वी जायस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नितीशकुमार रेड्डी, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्ण, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप, कुलदीप यादव.
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आणि धावांचा पाऊस पाडणाऱ्या साई सुदर्शनला यंदा टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यासोबतच अभिमन्यू ईश्वरनला ही संघात स्थान दिले आहे.
शमी आऊट, शार्दुल इन
१७ जणांच्या टीमची निवड करताना अनुभवी मोहम्मद शमीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर शार्दूल ठाकूर याचे टीम इंडियात कमबॅक झाले आहे. त्याशिवाय आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्ण यालाही स्थान देण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा