मुंबई । Mumbai
सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर खात्यावर संघाची घोषणा केली आहे.
भारतीय संघात यावेळी मोठे बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे तर, गोलंदाज नवदीप सैनी देखील या सामन्यातून कसोटी पदार्पण करणार आहे. भारतीय संघातून यापूर्वी दुखापतीमुळे उमेश यादव आणि केएल राहुल हे दोघेजण मालिकेतून बाहेर गेले आहेत. रोहित शर्माचा संघात समावेश झाल्याने भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ तयारीनिशी उतरणार हे निश्चित, त्यामुळे या सामन्याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
असा आहे भारतीय संघ –
अजिंक्य राहणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी (पदार्पण)
नवदीप सैनीचा अतिरिक्त वेगवान मारा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारा आहे. सपाट खेळपट्टीवर सैनीची गोलंदाजी अधिक घातक होते. सैनीनं आतापर्यंत सात एकदिवसीय सामने आणि १० टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ४६ प्रथम श्रेणी सामन्यात नवदीप सैनीनं १२८ विकेट घेतल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सैनी कसोटी पदार्पण करणार आहे.