Sunday, May 5, 2024
Homeनाशिकतहसीलदार, नायब तहसीलदार ८ मार्च पासून संपावर

तहसीलदार, नायब तहसीलदार ८ मार्च पासून संपावर

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

गौणखनिज माफियांविरुध्द कारवाई करताना अधिकार्‍यांवर हल्ले केले जातात. मात्र, चोरटयांवर कोणतिही कारवाई केली जात नाही. शासनाकडून कोणतेही संरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने ८ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.

- Advertisement -

यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार यांच्यावर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाला होता.या घटनेतील आरोपींवर मात्र कारवाईसाठी विलंब झाला. वाळू माफीया यांच्याकडून महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वारंवार जिवघेणे हल्ले होतात. संबधितांविरूध्द कारवाई केली जात नाही.

याकरीता अधिकार्‍यांना सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली होती. पण त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. नायब तहसिलदारांचा ग्रेड पे ४ हजार ६०० रूपये करण्यात यावा.

तहसिलदारांची अद्याप प्रसिध्द न झालेली सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करावी. अनेक अधिकार्‍यांकडे शासकीय वाहने उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांना तात्काळ वाहन उपलब्ध करून देण्यात यावे. अशा विविध मागण्या संघटनेने महसूल मंत्र्यांकडे केल्या आहेत.

यावर शासन लक्षच देत नसून, आता मात्र योग्य कार्यवाही न झाल्यास ८ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे. शासनाने आता जर ठोस निर्णय घेतला नाही, तर मात्र सोमवारपासून राज्यातील सर्वच महसूली कामकाज ठप्प होईल, अन् याचा परिणाम मार्चअखेरच्या कामाकाजावर पडण्याची तीव्र शक्यता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या