Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTejas MK-1A: "इथे प्रात्यक्षिक बघितले तेव्हा माजी छाती…" संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत...

Tejas MK-1A: “इथे प्रात्यक्षिक बघितले तेव्हा माजी छाती…” संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत तेजस MK-1A भारतीय हवाई दलात दाखल

नाशिक | प्रतिनिधी
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या (HAL) नवीन उत्पादन सुविधेतून तेजस एलसीए एमके-१A लढाऊ विमानाचे उद्घाटन केले. संरक्षण मंत्र्यांनी ‘एलसीए एमके१ए’ची तिसरी उत्पादन लाइन’ आणि ‘एचटीटी-४० विमानाची सेकंड प्रॉडक्शन लाइनचे उद्घाटन देखील केले. तेजस एमके-१ए ने आज नाशिक येथून पहिल्यांदाच उड्डाण केले. या उत्पादनामुळे भारतीय हवाई दलाची एकूण ताकद आणि क्षमता वाढेल. राजनाथ सिंह यांनी आज या लढाऊ विमानांचे पहिले उड्डाण पाहिले.

मेक इन इंडियाच्या धर्तीवर पहिले तेजस एमके 1A
मेक इन इंडियाच्या धर्तीवर पहिले तेजस एमके 1A लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर युनिटमधून आज आकाशात झेपावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक कामगिरी पार पडली. हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय व अधिकृतपणे दाखल झाले असून, त्यासोबतच्या नवीन उत्पादन लाईनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. बंगळुरूनंतरची ही दुसरी उत्पादन सुविधा असून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला.

- Advertisement -

भारताचे आत्मनिर्भरतेकडे पाऊल
एचएएल हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. इथे प्रात्यक्षिक बघितले तेव्हा माजी छाती गौरवाने फुलून गेली. हे आत्मनिर्भर भारताचे पाऊल आहे. आजवर इतर देशांवर आपला देश अवलंबून होता. आता भारतात ६५ टक्के विमान बनत आहोत. थोड्याच दिवसात आपण १०० टक्के आत्मनिर्भर होणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

YouTube video player

वॉटर कॅनने दिली सलामी
एचएएलच्या नाशिक युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या तेजस एमके 1A विमानाने आज पहिली झेप घेतली. विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवर अग्निशमन दलाने वॉटर कॅनने त्याचे स्वागत केले. यानंतर चित्तथरारक एअर शोचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी सहभाग घेतला.

नाशिक भूमी ऐतिहासिक
यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, लढाऊ विमानाची शानदार उड्डाणे झाले. गौरव, अभिमान वाटत होता. ज्यावेळी हा कार्यक्रम संपन्न होत होता, तेव्हा श्रीरामाचे भजन होत होते. श्रेया जोशी या गायिकेने गायले त्यांचे अभिनंदन. या निमित्ताने नाशिकला येण्याचा योग आला. नाशिकची भूमी ऐतिहासिक आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवाची भूमी आहे. इथे आल्यावर दिव्य भूमीत आल्यासारखे वाटते.

हे आत्मनिर्भ भारताचे पाऊल
इथे आस्था, श्रद्धा आहे. त्याच वेळी एचएएल हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. इथे प्रात्यक्षिक बघितले तेव्हा माजी छाती गौरवाने फुलून गेली. हे आत्मनिर्भर भारताचे पाऊल आहे. आजवर इतर देशांवर आपला देश अवलंबून होता. आता भारतात 65 टक्के विमान बनत आहोत. थोड्याच दिवसात आपण 100 टक्के आत्मनिर्भर होणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

तेजस एमके 1A लढाऊ विमानाची वैशिष्ट
-पूर्ण भारतीय बनावटीचे
-तेजस एमके 1A लढाऊ विमानाची वैशिष्ट्य
-पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान सर्वात हलके लढाऊ विमान आहे. ताशी 2000 किलोमीटर वेग हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे.
-2,000 किमी प्रतितास वेगाने उड्डाण क्षमता 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता आहे.
-सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता
-AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे
-शक्य SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद डिजिटल मॅप उंचीची अचूक माहिती मिळते.
-EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...