Tuesday, July 16, 2024
Homeदेश विदेशVIDEO : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर चाकू हल्ला

VIDEO : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर चाकू हल्ला

हैदराबाद | Hyderabad

- Advertisement -

तेलंगणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचे खासदार के प्रभाकर यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात लोकांनी त्यांना चाकून भोसकल्याचं वृत्त आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे.

दौलताबाद मंडळातील सुरमपल्ली गावात खासदार प्रभाकर रेड्डी हे प्रचार करत होते. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर तिथे गोंधळ उडाला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या त्या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी पकडले आणि चोप दिला आहे. तिथे पोलिसही असल्याने आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रभाकर रेड्डी यांना तातडीने गजवेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांना तिथून हैदराबादला हलविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. अद्याप हल्लेखोराची माहिती मिळालेली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. तेलंगानाचे अर्थ मंत्री टी हरीष राव यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते गजवेलकडे निघाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या