Monday, June 24, 2024
Homeमनोरंजन"नेमकं रिकामं काय? हातातला फोल्डर की..."; प्रकाश राज यांनी PM मोदींना पुन्हा...

“नेमकं रिकामं काय? हातातला फोल्डर की…”; प्रकाश राज यांनी PM मोदींना पुन्हा डिवचलं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज जुन्या संसद भवनेतून नव्या संसदमध्ये प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला आहे. यामुळे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याचं समोर आले आहे.

प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात एक रिकामा फोल्डर आहे, तसंच त्यांच्या दुसरा हात त्यांच्या खिशात आहे. हा फोटो पोस्ट करत प्रकाश राज यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे. २०१४ पासून रोज पडलेलं कोडं, मला सांगा नेमकं काय रिकामं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असेला फोल्डर? त्यांच्या जॅकेटचा खिसा की त्यांचं डोकं? या आशयाचं ट्विट करत प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान यावरुन मोदी समर्थक आणि मोदी विरोधक कमेंट्स मध्ये भिडले आहेत. ‘त्यांचा खिसा रिकामा आहे कारण त्यांनी 2014 पासून तुमच्या मास्टरसारखे घोटाळे केले नाहीत.’ असा टोला एका युझरने मारला आहे. ‘कदाचित तुमच्या भविष्यासारखंच रिकामं’ अशी खोचक कमेंट एकाने केली आहे. तर काहींनी फोल्डर रिकामं असल्याचं नमूद केलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या