Saturday, September 21, 2024
Homeमनोरंजनदाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण आले समोर

दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण आले समोर

दिल्ली | Delhi

- Advertisement -

गेल्या काही वर्षात बॉलिवूड, हिंदी मालिका सृष्टीतील कलाकारांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील धक्कादायक बातमी समोर येत आहे.

अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुधीर वर्माने २३ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीरच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा परसली आहे.

सुधीर वर्मा यांचे सहकलाकार असलेले अभिनेते सुधाकर यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सुधीर वर्मा यांच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुधीर वर्माच्या कुंडानापू बोम्मा चित्रपटात त्यांनी सोबत काम केले होते.

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

सुधीर वर्मा यांनी आत्महत्येचे पाऊल कोणत्या कारणासाठी उचलले हे समजू शकलेले नाही. मात्र काही काळापासून ते वैयक्तिक आयुष्यात अडचणीतून जात असल्याचे बोलले जात आहे. तो मानसिकदृष्ट्याही खूप दडपणाखाली होता. त्यामुळेच सुधीर वर्मा यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.

सुधीरने २०१३ मध्ये ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्याच्या या पदार्पणाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतरच्या ‘कुंदनपू बोम्मा’ या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. सुधीरच्या करिअरमधील दुसरा चित्रपट ‘दोचे’ हासुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.

मंदिराच्या उत्सवात दुर्दैवी घटना; क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

यामध्ये त्याच्यासोबत नाग चैतन्यची भूमिका होती. मात्र केशवा आणि रणरंगम यांसारख्या चित्रपटांमुळे सुधीर प्रकाशझोतात आला.२०२२ मध्ये त्याच्या ‘साकिनी दाकिनी’ या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटाला भरपूर यश मिळालं. यामध्ये त्याच्यासोबत निवेता थॉमस आणि रेगिना कॅसँड्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिडनाइट रनर्स’ या साऊथ कोरियन चित्रपटाचा हा रिमेक होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनं कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या २१ व्या वर्षी तुनिशाने जगाचा निरोप घेतला होता.

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

- Advertisment -

ताज्या बातम्या