मनमाड | प्रतिनिधी Manmad
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज (IMD) खरा ठरत असून गेल्या दोन दिवसा पासून मनमाड शहर (Manmad City) परिसरासह ग्रामीण भागात उष्णतेची लाट आली असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पारा 40 अंश सेल्सियस पर्यंत गेला आहे….(manmad temperature increased)
त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून दुपार नंतर बाजारपेठ (market area) आणि मुख्य रस्त्यावर (main road) शुकशुकाट पसरू लागला आहे. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना उन्हाचा चटका बसू नये म्हणून काही व्यापाऱ्यांनी हिरवा नेट शेड (green shade net) टाकला असून उसाचा रस आणि इतर थंडपेयाची मागणी वाढून शीतपेय गृह गजबजू लागले आहे.
उष्म्यात मोठी वाढ झाली असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नेहमी होळी नंतर तापमानात हळूहळू वाढ होत असते. मात्र, यंदा आता पासूनच तापमान वाढल्यामुळे पुढे एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल याची चिंता सर्वांना लागली आहे. वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त फटका हा पत्र्यांचे घरे असलेल्या सोबत झोपड्या मध्ये राहणाऱ्याना बसत असून त्यांना एकीकडे प्रचंड उकाडा घरात बसू देत तर दुसरीकडे सूर्य आग ओकत असल्यामुळे बाहेर देखील पडता येत नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे.
यंदाचा पावसाळा आणि हिवाळा कडक होता. त्यामुळे उन्हाळा देखील कडक राहील अशी चिन्हे दिसू लागली आहे. मार्च महिना सुरु होताच उन्हाचे चटके बसू लागले होते मात्र 15 दिवसा पूर्वी शहर परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती.
त्यामुळे तापमानात घट झाली असताना त्यानंतर पुन्हा तापमानात हळूहळू वाढ होत गेली. गेल्या दोन दिवसा पासून तर सूर्य आग ओकू लागला. असल्याने शहर परिसरात उष्णतेची लाट आली आहे.
आज तर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पारा 40 अंशां पर्यंत गेला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या लग्न सराई नसली तरी कोरोनामुळे दोन वर्षात अनेकांचा मृत्यू झालेला आहे.
मात्र, तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा त्रास ग्राहकांना होऊ नये यासाठी काही व्यापाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेत हिरवा नेट शेड टाकला आहे.
वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागात बसत असून भूमिगत पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या तर काही कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहे.बोरवेलची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही.
त्यामुळे पाणी टंचाई (Water scarcity) निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. कडक उन्हामुळे जंगलातील नदी-नाले देखील कोरडे पडल्याने पशु-पक्षी पाण्यासाठी गावाकडे, शहराकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
नेहमी होळी नंतर तापमानात हळूहळू वाढ होत असते मात्र यंदा आता पासूनच तापमान वाढल्यामुळे पुढे एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल याची चिंता सर्वांना लागली आहे.