Friday, June 21, 2024
Homeनगरटेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

टेम्पोच्या धडकेत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश विष्णू फुंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात फुंदे टाकळी शिवारात प्रवरा माध्यमिक विद्यालयासमोर हि अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे.

ऋषिकेश हा मोटारसायकल घेऊन किराणा सामान आणायला चालला होता. रस्त्यावर प्रशांत फुंदे भेटल्याने तो बाजुला गाडी उभी करून त्याच्याशी बोलत होता. तेवढ्यात पाथर्डीकडून आलेला आयशर टेम्पो (एमएच 12 एमडी 687) याने उभ्या असलेल्या मोटारसायकलला विरोधी दिशेला येऊन जोराची धडक दिली. यामध्ये ऋषिकेशला गंभीर जखमी झाला. प्रशांत फुंदे याने तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले.

गंभीर जखमी ऋषिकेश याला पाथर्डीच्या दवाखान्यात आणले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो घेऊन पसार झाला. फुंदे टाकळी ग्रामस्थांनी रस्ता अडवून रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. पाथर्डी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या