Monday, May 27, 2024
Homeनाशिकसिन्नर-घोटी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरला आग; साईभक्त बालबाल बचावले

सिन्नर-घोटी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरला आग; साईभक्त बालबाल बचावले

नाशिक | Nashik

सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti Highway) आज पहाटे मुंबई (Mumbai) येथून शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग (Fire) लागल्याची घटना घडली. या घटनेत गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली असून गाडीमधील सर्व १८ प्रवाशी (Passenger) बालबाल बचावले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून शिर्डीच्या दिशेने १८ प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हल गाडी एमएच ०४ जी.पी. ०४८४ ही गाडी घोरवड घाटातून (Ghorwad Ghat) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास जात असतांना गीताई पेट्रोल पंपासमोर गाडीमधून अचानक धूर निघू लागला. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यावेळी गाडीतील सर्व १८ प्रवाशांना सुरक्षित खाली उतरविले.

यानंतर गाडीने क्षणार्धात पेट घेतल्याने संपूर्ण गाडी आगीत जळून खाक झाली. त्यात प्रवाशांचे सामान सुद्धा जळून गेले. तसेच या घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेचा (Sinnar Municipality) अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर सिन्नर पोलीसांचे (Police) मदत पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आणि यानंतर आग आटोक्यात आणली.

दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास सिन्नर पोलीस स्टेशनचे (Sinnar Police Station) पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निवृत्ती गीते, गौरव सानप हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या