Saturday, May 4, 2024
Homeजळगावटेम्पो ट्रॅव्हलरची दुचाकीस धडक ; महिलेचा मृत्यू

टेम्पो ट्रॅव्हलरची दुचाकीस धडक ; महिलेचा मृत्यू

पाचोरा । Pachora

शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक टेम्पो ट्रव्हलरने (Tempo Traveler) दुचाकीस जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकीवरील 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा (Pachora) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

वरखेडी ता. पाचोरा येथील सुल्ताना बी शकील काकर (वय – 33) ह्या पती सोबत दुचाकीने दि. 14 फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या वडिलांना बघण्यासाठी जात असतांना शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक त्यांच्या दुचाकीस जारगाव चौफुलीकडुन भडगावच्या दिशेने जाणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलर (क्रं. एम. एच. 19 – वाय – 6385) ने मागावुन जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवर मागील बाजुस बसलेल्या सुल्ताना बी शकील काकर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने सुल्ताना बी शकील काकर यांना पुढील उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात (Jalgaon Rural Hospital) दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील टेम्पो ट्रॅव्हलर व चालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेप्रकरणी पाचोरा (Pachora) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. मयत सुल्ताना बी शकील काकर यांचे पाश्चात्य पती, एक मुलगी, दोन मुले असा परिवार असुन त्यांचे निधनाने वरखेडीसह (Varkhedi) परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या