Saturday, May 4, 2024
Homeजळगावअमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना विषबाधा

अमळनेर तालुक्यातील गांधली येथील दहा बालकांना विषबाधा

अमळनेर : amalner

तालुक्यातील गांधली येथील दहा बालकानी एरंडी सदृश्य बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाली आहे. मुलांना संडास आणि उलट्यांचा त्रास होत आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे.

नामदार अनिल पाटील यांनी केली चौकशी : अमळनेर गांधली येथील घटनेची माहिती मिळताच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी तात्काळ ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टरांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या तसेच नातेवाईकांना देखील फोन करून धीर दिल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद यांचेशी संवाद साधत जिल्हा स्तरावरून बालरुग्ण डॉक्टरांची टीम पाठविण्याच्या सूचना केल्याने तातडीने टीम रवाना करण्यात आली. बहुतांश मुलांची प्रकृती स्थिर असल्याने मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले

- Advertisement -

तालुक्यातील गांधली येथील जोया सुलतान पिंजारी वय ९, अयान सुलतान पिंजारी वय ११, अर्जुन सुरेश भिल वय १०, करण सोमा भिल वय ९, अक्षरा सुनील भिल वय १०, नर्गिस सुलतान पिंजारी वय ३, गोकुळ प्रकाश भिल वय १२ वर्षे, अश्विनी सुरेश भिल वय ११ वर्षे, संगीता नारायण संदानशीव वय १०, किरण अविनाश भिल वय ११ सर्व रा गांधली ही सर्व मुले ५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका मंदिराच्या प्रांगणात खेळत असताना एका मुलीने एरंडीच्या बियांसारखा पदार्थ आणला. त्या बिया सर्व मुलांनी खाल्ल्या. काहींनी एक दोन बिया तर काहींनी जास्त झाल्यामुळे सुमारे साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक संडास उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला दोन बालके, नंतर पाच, नंतर तीन अशी एकापाठोपाठ दहा बालके उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रांजली पाटील, डॉ प्रकाश ताडे यांनी तातडीचे उपचार सुरू केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर याना घटना कळताच त्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवून बालकांच्या आरोग्य सेवेबाबत आदेश दिले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या