Wednesday, September 11, 2024
Homeधुळेधुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला दहा व्हेंटिलेटर

धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला दहा व्हेंटिलेटर

धुळे – Dhule

खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पीएम केअर्स फंडातून येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीश रुग्णालयाला दहा व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे संकट आलेले आहे. धुळे जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढत असून यापुढे अजून जास्त उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन खा.डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्र शासनाकडे पीएम केअर्स फंडातून व्हेंटिलेटरची मागणी केली होती.

खा. डॉ. भामरे यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाने पी.एम केअर्स फंडातून धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले.

केंद्र शासनाच्या पीएम केअर्स फंडातून दहा व्हेंटिलेटर मिळाल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी चांगली व उत्तम सोय होणार असून गंभीर रुग्णांवर उपचार करतांना देखील डॉक्टरांना सोयीचे होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या