Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik News : चुकीचे औषधोपचार केल्याने दहा वर्षीय बालकाचा मृत्यू; डॉक्टरवर गुन्हा...

Nashik News : चुकीचे औषधोपचार केल्याने दहा वर्षीय बालकाचा मृत्यू; डॉक्टरवर गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील अंबड परिसरामधील जाधव संकुल येथे खाजगी दवाखाना चालविणाऱ्या डॉ. नितीन फरगडे (रा. मारुती मंदिरासमाेर, संजीवनगर, अंबड, नाशिक) याने दहा वर्षीय मुलावर चुकीचे औषधोपचार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉक्टरवर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अमन अखिलेश शर्मा (वय १०, रा. जाधव संकुल, अंबड लिंक राेड, मूळ रा. आझमगढ, उत्तरप्रदेश) असे मयत बालकाचे नाव आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, अखिलेश शर्मा हे अंबड एमआयडीसीतीस कंपन्यांत कामगार म्हणूण काम करतात. मुलांचे पालनपाेषण करतांना १३ सप्टेंबर राेजी त्यांचा धाकटा मुलगा अमन याला १०२ फँरेनहाइट ताप आला. त्यामुळे त्याचे वडील त्याला डाॅ. फरगडे यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. तेथे फरगडे यांनी औषधे व गाेळ्या दिल्या. यानंतर पुढीस एक-दाेन दिवसांत त्याचा ताप कमी झाल्याने ताे खेळायला लागला. परंतु, औषधांचा डाेस संपल्याने अमनला घेऊन त्याचे वडील पुन्हा डाॅ. फरगडे यांच्याकडे तपासण्यास आले. तेव्हा फरगडे हे इतर रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना फाेन आला.

फाेनवर बाेलण्याच्या नादात इतर रुग्णांची ट्रीटमेंट करतांना कळत-नकळत फरगडे यांनी दुसऱ्या रुग्णासाठी लागू केलेले एक इंजेक्शन अमनला टाेचले. त्यामुळे ताे काही मिनिटांतच क्लिनिकमध्ये खाली काेसळला. यानंतर आरडाओरड झाल्याने फरगडे यांने आवश्यक ते उपचार करुन सलाईल लावले. तसेच काही टेस्ट केल्या. मात्र, प्रकृतीत सुधारणा हाेत नसल्याने अमनला ज्युपिटर रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले. तेथेही त्याच्यावर उपचाराचे प्रयत्न फाेल ठरले आणि त्याचा मृत्यू झाला. डाॅ. फरगडे हा ज्युपिटर हाॅस्पिटलच्या मंडळावर असून त्यांची चाैकशी करण्यासाठी पाेलिसांनी नाेटीस पाठविली आहे. मृत अमनला अन्य दाेन माेठे भाऊ असून त्याची आई काही वर्षांपूर्वीच निवर्तली आहे. 

न्यायालयाने घेतली दखल

अमनचे वडील अखिलेश यांनी डाॅ. फरगडे याच्याविराेधात न्यायालयात तक्रार दाखल केली. अखेर न्यायालयाने प्रकरण जाणून घेत डाॅक्टरविरुद्ध अंबड पाेलिसांना भादंवि कलम (३०४-अ) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन अटकशिवाय नाेटीस देऊन चाैकशी करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार अंबड एमआयडीसी चाैकीचे उपनिरीक्षक ए. के. पाडेकर तपास करत आहेत. 

- Advertisment -

ताज्या बातम्या