Sunday, September 8, 2024
Homeनाशिकलग्नानंतर दहा वर्षांनी ‘ती’ने दिला तिळ्यांना जन्म

लग्नानंतर दहा वर्षांनी ‘ती’ने दिला तिळ्यांना जन्म

नाशिकरोड । Nashikroad

जेलरोड परिसरातील नवजीवन हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये मागील आठवड्यात तिळे जन्माला आलेत. जन्मलेल्या तिन्ही मुलींचे कुटुंबियांनी आनंदात स्वागत केले. जेलरोड परिसरातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेले नवजीवन हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये तिळे जन्माला आल्याने कुटुंबीयांसोबतच हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. नितीन आरसुळे व हॉस्पिटलच्या स्टाफचा आनंद गगनात मावत नव्हता. लग्न झाल्यानंतर दहा वर्षांनी सदर महिलेला संतती प्राप्त झाली.

- Advertisement -

शारीरिक प्रतिकूल परिस्थिती व जगभरात थैमान घातलेल्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव अशा परिस्थितीत आठव्या महिन्यातच सदर महिलेची प्रसूती करावी लागणार असल्याने सर्वांच्याच चिंता वाढली होती. मात्र डॉ. नितीन आरसुळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर स्त्रीला योग्य समुपदेशन करून तिच्यासह तिच्या कुटुंबियांचे मानसिक मनोबल वाढवले.

सदर महिलेवर योग्य उपचार करून यशस्वीपणे बाळंतपण करण्यात आल्याने प्रसूत माता व तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले व जन्मलेल्या तिन्ही मुलींचे आनंदाने स्वागत केले. डॉ. आरसुळे यांना डॉ. सचिन पाटील व नवजीवन हॉस्पिटल व मॅटर्निटी होमच्या सेवकांचे उत्तम सहकार्य लाभले.

आई होणे यापेक्षा मोठे सुख जगात दुसरे काही असू शकत नाही. योग्य औषधोपचार, व्यायाम, आहार, गरोदरपणातील दिनचर्या, समुपदेशन यामुळे भयमुक्त व तणावमुक्त प्रसूती होण्यास मदत होते. – डॉ.नितीन आरसुळे, स्त्रीरोगतज्ज्ञ

- Advertisment -

ताज्या बातम्या