Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याझारखंडमध्ये रेल्वे अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू

झारखंडमध्ये रेल्वे अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू

झारखंडमधील जामतारा जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. विद्यासागर रेल्वे सेक्शनच्या कालाझरियाजवळ ट्रेनची धडक बसून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन मार्गावरून जात होती. दरम्यान, गाडीला आग लागल्याचे चालकाला वाटले. यामुळे त्यांनी ट्रेन थांबवली. यावेळी अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. त्याचवेळी अप लाईनवर जाणाऱ्या ईएमयू ट्रेनने 12 प्रवाशांना धडक दिली. त्यामुळे 12 प्रवाशांना त्याचा धडक बसून मृत्यू झाल्याची माहिती समजते.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. किती लोकांचा मृत्यू झाला याची ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या