Wednesday, April 2, 2025
HomeमनोरंजनRRR च्या 'नाटू नाटू'ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क...

RRR च्या ‘नाटू नाटू’ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

दिल्ली | Delhi

एस.एस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने फक्त भारतातील प्रेक्षकांवरच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांवर भुरळ घातली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील Naatu Naatu गाण्याला ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ कॅटेगरीत ऑस्कर मिळाला आहे.

- Advertisement -

ऑस्कर जिंकल्यानंतर हे गाणे खूप चर्चेत आले आहे. परदेशातही या गाण्याचा मोठा चाहता वर्ग आहे. या गाण्यावर लोक नाचत आहेत, आता वाहनेही यावर डान्स करण्यात मागे नाहीत. होय, कदाचित तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. ‘नाटू-नाटू’ या गाण्याचे कौतुक करत टेस्ला कार मालकांनी गाण्याच्या सुरात त्यांच्या कारचे दिवे चमकवले. अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात हा टेस्ला कार लाइट शो आयोजित करण्यात आला होता.

RRRच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एकमिनिटापेक्षा अधिक अंतराचा हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, “@Teslalightshows न्यू जर्सी मध्ये #Oscarविनिंग सॉन्ग #NaatuNaatuच्या बीट्ससोबत लाइट सिंक करण्यासाठी धन्यवाद… सर्वांना प्रेम व धन्यवाद.

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, कशा पद्धतीने पार्किंगमध्ये उभ्या डझनभर कार गाड्या बीट्ससोबत आपल्या हेडलाइट्सला सिंक करत ब्लिंककरत आहेत. वाजवण्यात आलेल्या बीटच्या आधारावर लाल आणि सफेद रंगाच्या लाइट्सइकडे-तिकडे केल्या जात आहेत. हे पाहताना खूप अद्भुत लाइट शो दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय ही भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, सातासमुद्रापार आपल्या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे, अशाही कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव हद्दीतील धात्रक फाटा परिसरामध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर, ५० हजारांचा...