Monday, January 26, 2026
Homeक्रीडाCheteshwar Pujara: कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारीची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती; भारताची आणखी...

Cheteshwar Pujara: कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारीची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती; भारताची आणखी एक ‘भिंत’ ढासळली

मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल २० वर्ष क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण करून पुजाराने अखेर क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रवीड यांच्यानंतर वॉल ऑफ क्रिकेट असे म्हणून चेतेश्वर पुजाराला ओळखले जायचे. पण आता ही भिंतही ढासळली आहे. पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्कारली आहे. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात केली होती. आता त्याने तब्बल 15 वर्षानंतर पुजाराने इनिंग संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मिडियावरुन निवृत्ती जाहीर
चेतेश्वर पुजारा याने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडणं अशक्य आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, आणि आता तो आला आहे. अपार कृतज्ञतेने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!”

- Advertisement -

बीसीसीआयचे मानले आभार
सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे आणि प्रचंड कृतज्ञतेने मी सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत संधी आणि पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छितो. गेल्या काही वर्षांत मी ज्या संघांचे, फ्रँचायझींचे आणि काउंटींचे प्रतिनिधित्व करू शकलो आहे त्यांचा मी तितकाच आभारी आहे, असेही चेतेश्वर पुजारा म्हणाला आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...