Tuesday, January 20, 2026
HomeनगरTET : गुण पडताळणीसाठी 21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

TET : गुण पडताळणीसाठी 21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 2025 चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार/ परीक्षार्थींना लॉगिन करुन ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

- Advertisement -

अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन अर्ज करावा लागेल; यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक आहे, आणि वैध कारणांशिवाय केलेले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Rahata : नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्या करीता महायुती सरकारने सुरु केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी...