Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाला धक्का! आणखी एक आमदार नॉट रिचेबल, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या...

ठाकरे गटाला धक्का! आणखी एक आमदार नॉट रिचेबल, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

मुंबई | Mumbai

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या बंडखोरीचे पडसाद जिल्ह्यासह तालुका स्तरावर देखील उमटले होते. बंडखोरीनंतर (Rebellion) दिवसेंदिवस शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

- Advertisement -

तर उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन असल्याने ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून वर्धापनदिनाची (Anniversary) जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, त्याअगोदर आणखी एक आमदार ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांचा फोन नॉटरिचेबल आहे. त्यामुळे कायंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून आज सायंकाळी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश (Join) करणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायंदे यांचा हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

JEE-Advanced चा निकाल जाहीर; असा तपासा निकाल

दुसरीकडे कालच शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. आपल्याला मनासारखे काम ठाकरे गटात करायला मिळत नसल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली होती. तसेच आपण राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कोण आहेत मनिषा कायंदे?

मनिषा कायंदे यांनी भाजपकडून २००९ ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर २०१८ साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमके काय घडलं? उज्ज्वल निकमांनी...

0
बीड | Beedबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला २० मार्च रोजी सुरुवात झाली असून आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार...