मुंबई | Mumbai
आज शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाची तोफ धडाडणार असून उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून (Maharashtra) शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. असाच एक मुस्लिम शिवसैनिक (Muslim ShivSainik) संगमनेर येथून दीडशे कार्यकर्त्यांसह मुंबईत (Mumbai) दाखल झाला असून त्याने गळ्यामध्ये एक बॅनर घालत शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली आहे….
मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; गिरणा नदीपात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजीज याकूब मोमीन असे या शिवसैनिकाचे नाव असून त्याने गळ्यात घातलेल्या बॅनरवर (Banner) आदेश फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र विकणाऱ्या कलंकित गद्दारांना २०२४ मध्ये गाडून टाकू, मुस्लिम मावळा, असे लिहिण्यात आले आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करणार असून शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल झाले आहेत.
Accident News : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
दुसरीकडे सातारा (Satara) येथील एक शिवसैनिक शिवतीर्थावर पेटती मशाल घेऊन दाखल झाला असून याच मशालीत गद्दारांना जाळू, असा निर्धार त्याने बोलून दाखवला आहे. त्यामुळे आज दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस