मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील सत्तासंघर्षात भारत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आज, रविवारी पहिलेच राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर होत आहे. या शिबिराला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे कोणावर तोफ डागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक शहरात 28 जून पर्यंत मनाई आदेश लागू
वरळी येथील एनएससीआय डोम येथे सायंकाळी होणाऱ्या शिबिराला महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विकासकामांवरून शिवसेना आणि भाजपाचे नेतेमंडळी ठाकरे गटावर टिकेची झोड उठवत आहेत. महाविकास आघाडीच्या गेल्या अडिच वर्षांच्या कार्यकाळात कोणतीच कामे झाली नाहीत. विकासकामात फक्त स्पीडब्रेकर टाकण्याचे काम झाले असे आरोप करीत हे स्पीडब्रेकर हटविण्याचे काम शिवसेना-भाजपा महायुतीच्या सरकारने केले असल्याचा दावा केला जात आहे.
पंचायत समितीतील लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात
त्यातच राज्यात महिलांवरील वाढलेले अत्याचार, विरोधकांना फोनवरून जीवे मारण्याच्या येणाऱ्या धमक्या, वारकऱ्यांवर पोलिसांकडून केलेला लाठीचार्ज यापार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे सरकारवर कोणते आसुड ओढतात आणि आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमिवर शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना कोणता संदेश देणार याकडे प्रसारमाध्यमांबरोबरच राजकिय निरीक्षकांचेही लक्ष लागले आहे.
दुकान निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.हेगडेवार आणि स्वा.सावरकर यांचे धडे कर्नाटक सरकारने पाठ्यक्रमातून वगळले आहेत. त्यापार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, तेच आता वीर सावरकरांचा धडा पुस्तकातून काढून टाकत आहेत. हाच काय महाविकास आघाडीचा पॅटर्न, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टिकेला उद्धव ठाकरेही प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे.