Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : शेतकऱ्याने माळरानावर फुलविली थायलंड संशोधित पेरूची बाग

Video : शेतकऱ्याने माळरानावर फुलविली थायलंड संशोधित पेरूची बाग

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा द्राक्ष (Grapes) उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. त्यातच आता येथील शेतकरी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून माळरानावरील (खडकाळ) जमीनीवर देखील शेती (Agriculture) करू लागला आहे…

- Advertisement -

अशातच एका माळरानावरील जमिनीवर चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) खडकओझरमधील शेतकरी सिद्धार्थ केदारे (Farmer Siddharth Kedare) यांनी थायलंड संशोधित पेरूच्या झाडांची (Guava Trees) लागवड केली असून त्यांच्या या प्रयोगाची जिल्हाभरात चर्चा होत आहे.

केदारे यांनी १२ बाय २ फुटाच्या अंतरावर १ एकर क्षेत्रावर १८१५ पेरूची झाडे लावली असून या झाडांना सारखे सारखे पेरू येत असल्याने त्यांना सदाबहार पेरू म्हटले जाते. तसेच तीन एकर क्षेत्रावर १२ बाय २ फुटाच्या अंतरावर जी पेरूची झाडे लावली जातात ती फक्त १ एकरवर केदारे यांनी लावली आहेत.

यासोबतच केदारे यांनी साडे बारा एकरमध्ये १० हजार झाडे लावली आहेत. तसेच एका प्लॉटमध्ये ड्रॅगन फूटची (Dragon Foot) लागवड करण्यात आली असून आंतरपिक म्हणून मध्यभागी पेरूची झाडे लावली आहेत. तर इतर भागात काजू, चिंच, अॅपलबोरसह इतर देशी-विदेशी झाडांची लागवड केली आहे.

दरम्यान, यासर्व झाडांना केदारे ड्रीपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करत असून त्यासाठी त्यांनी दीड कोटी लिटर पाणीसाठ्याची दोन शेततळे तयार केली आहेत. त्याचबरोबर केदारे यांनी शून्य मशागतीच्या शेतीचा प्रयोग अवलंबिला असून माती (Soil) जपण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या