नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपानंतर एकच हाहाकार उडाल्याचे पहायला मिळाले. या भुकंपानंतर अनेक स्कॅयरॅपर इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भुकंपानंतर लोक सैरावैरा धावपळ करताना तसेच इमारती, पुल कोसळतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. दरम्यान म्यानमार येथील भूकंपाचे थायलंडसह शेजारील अनेक देशांमध्ये धक्के जाणवले.
म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय एवा ब्रिजही कोसळल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही, तर चीन आणि तैवानच्या काही भागांनाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे. एका रिपोर्टनुसार, जर्मनीच्या GFZ भूविज्ञान केंद्राने सांगितले की हा भूकंप दुपारी १० किलोमीटर खोलीवर आला.
या भुकंपाची तिव्रता इतकी होती की थायलंड आणि म्यानमारमधील अनेक गगनचुंबी इमारती अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमधील अनेक मोठ मोठे टॉवर्स कोसळले. हजारो लोक बेपत्ता झाले आहे.
म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या या शक्तिशाली भूकंपानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीवल स्विमिंग पूलमधील पाणी घाली पडताना दिसत आहे.
बँकॉकमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्यानंतर इमारतींमध्ये अलार्म वाजू लागला. यानंतर दाट लोकवस्तीतील उंच इमारती आणि हॉटेलमधून लोकांना बाहेर फेकण्यात आले. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही. भूकंप इतका जोरदार होता की उंच इमारतींमधील जलतरण तलावातील पाणी थरथरू लागले आणि लाटा उसळताना दिसत होत्या. त्याचे केंद्र म्यानमारच्या मोनीवा शहराच्या पूर्वेस सुमारे ५० किलोमीटर (३० मैल) होते. म्यानमारमध्ये भूकंपामुळे किती नुकसान झाले याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा