Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रकळव्यातील रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरुच; आजही ४ रुग्णांचा मृत्यू

कळव्यातील रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरुच; आजही ४ रुग्णांचा मृत्यू

ठाणे | Thane

कळवा (Kalava) येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chatrapati Shivaji Maharaj Hospital) मृत्यूचे सत्र सुरूच. गुरुवारी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी अवघ्या दहा तासात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली असताना आता आज सोमवारी चार रुग्णांचा मृत्यू (4 Patient Died)झाल्याची बातमी समोर येत आहे.

- Advertisement -

रात्री १२ वाजल्यापासून या रुग्णालयात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. कळव्याच्या रूग्णालयात एका रात्रीत झालेल्या १८ मृत्यूंवरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केलीय. मिंधे सरकार आल्यापासून राज्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे असे राऊत म्हणाले. राज्यात वेळीच मनपा निवडणुका झाल्या असत्या, लोकप्रतिनिधींचं राज्य असते तर असे मृत्यू झाले नसते असे राऊत म्हणाले.

काका-पुतण्याच्या भेटीवर बच्चू कडूंनी वर्तवले भाकीत; म्हणाले, महायुती आणखी…

कळवा रुग्णालयावर सध्या प्रचंड ताण आहे. रुग्णालयात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण गेल्या ४ दिवसात २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रविवारी मृत्यू झालेल्या १७ पैकी १३ रुग्ण हे ICUमधील होते तर ४ रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. या आधी १० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला होता.

जे रुग्ण दगावले त्यातील काही रुग्णांचा अपघातग्रस्त, तर काहींचा अल्सर, यकृत व्याधी, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, लघवी संसर्ग, ऑक्सिजनची कमतरता, रक्तदाब कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मृतांमध्ये एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेसह ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर उर्वरितांमध्ये ३३ ते ८३ वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.

Chandrayaan 3 Update : ‘चांद्रयान-३’चा आणखी एक टप्पा पूर्ण!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन केले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या