Saturday, July 27, 2024
Homeनाशिक...अखेर 'त्या' महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

…अखेर ‘त्या’ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पंचवटी | Panchavati

मखमलाबाद रोडवरील (Makhmalabad Road) शिंदेनगर (Shindenagar) परिसरातील भाविक सोसायटीतील एका सदनिकाला आग लावण्याचा प्रकार मंगळवारी (दि. १०) रोजी घडला होता. रिक्षाचालक सुखदेव गुलाब कुमावत (Sukhdev Kumawat) या रिक्षाचालकाने ही आग लावली होती…

- Advertisement -

त्यात दोन महिला गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यातील भारती आनंद गौड (Bharti Gaud) (५८, रा. भाविक सोसायटी, बी विंग, शिंदेनगर, पंचवटी) या महिलेचा मृत्यू झाला.

प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून जाळपोळीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी (Police) रिक्षाचालकाच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. महिलेचा मृत्यू झाल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविक या सोसायटीतील ए विंगमध्ये राहणाऱ्या प्रदीप ओमप्रकाश गौड (३९) (Pradeep Gaud) यांच्या सदनिकेत मंगळवारी त्यांच्या मावशी भारती गौड (Bharti Gaud) या आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास या कुटुंबाच्या परिचयाचा रिक्षाचालक सुखदेव कुमावत हा हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला.

त्याने घरात असलेल्या भारती गौड यांना मारहाण केली आणि सोबत आणलेल्या बाटल्यातील पेट्रोल टाकून आग लावून तो फरार झाला. त्यावेळी घरात प्रदीप यांची आई सुशिला गौड, मावशी भारती गौड, आजोबा जानकीदास गौड, पार्थ गौड व चिराग गौड हे होते.

पार्थ हा अभ्यास करीत असताना हॉलमध्ये झालेल्या भांडणाचा आवाज व लागलेली आग बघून त्याने बेडरुमचा दरवाजा बंद केला आणि त्याच्या आई-वडीलांना फोन करून घटनेचे माहिती दिली होती. या आगीत सुशिला गौड व भारती गौड या दोघी भगिनी भाजल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान भारती गौड यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या