Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाआयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून

मुंबई | Mumbai

येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा १३ वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमधे खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. भारतामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी यंदाची आयपीएल यूएईत होणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले होते. त्यास आता भारत सरकारने संमती दिल्यामुळे ही स्पर्धा यूएईत होणार यास आता शिक्क्कामोर्तब झाले.

- Advertisement -

रविवारी २ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये १० महत्वपूर्ण निर्णयांवर चर्चा करण्यात आली. यामुळे आता आयोजक , संघमालक , प्रायोजक , खेळाडू सर्व यंदाच्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत १० डबलहेडर म्हणजे एकाच दिवसात २ सामने खेळवण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा एकूण ५३ दिवस चालणार आहे. त्यामुळे आयपीएल चाहत्यांना ५३ दिवसात ६० सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. तसेच

बैठकीत घेण्यात आलेला आणखी महत्वाचा निर्णय म्हणजे सर्व प्रायोजक पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. यात चिनी प्रायोजक व्हिवोचाही समावेश आहे. यंदाचे रात्रीचे ८ वाजताचे सर्व सामने अर्धा तास लवकर म्हणजे ७:३० ला सुरु होणार आहेत. तर दुपारी ४ चे सामने ३:३० वाजता सुरु होणार आहेत. प्रत्येक संघात प्रत्येकी २४ खेळाडू असतील. तर राखीव खेळाडूंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही.

सर्व सामने अबुधाबी , शारजा , दुबई या ३ मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. या लीगसाठी जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात एसोपी म्हणजे कार्यप्रणाली बनवण्यात येणार आहेत. स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या