Saturday, May 18, 2024
Homeजळगाव25 वर्षीय युवतीला दोन लाखात विकले

25 वर्षीय युवतीला दोन लाखात विकले

रावेर । Raver प्रतिनिधी-

पाल (ता.रावेर) येथील 25 वर्षीय महिलेला दोन अनोळखी महिलांनी उज्जैन (Ujjain) येथे 2 लाखात विकून, तिचे लग्न लावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास परावृत्त केल्याने याबाबत पीडितांच्या तक्रारीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पिडीतेला तब्बल वर्षभराआधी गुंगीचे औषध देवून मध्यप्रदेशात पळवून नेण्यात आले होते. त्या ठिकाणी महिलेचे लग्न लावून, तिला जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवण्यास परावृत्त केल्याने, याबाबत पिडीतेने रावेर पोलिसात तक्रार दिल्याने पती व दोन अनोळखी महिला यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीतेने दिलेल्या तक्रारीत दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून 2 लाखात लग्न करण्याच्या उद्देशाने विक्री केली. मनाविरुद्ध राकेश वर्मा रा.घाटपीपल्या ता.झारडा जी. उज्जैन (Ujjain) यासोबत लग्न लावून दिले. त्याने वारंवार पिडीतेवर अत्याचार केला. यात पिडीत महिलेची सासू शामू वर्मा, सासरे भगीरथ वर्मा, दीर कमल वर्मा, दिनेश वर्मा, ननद तेजू यांनी संगनमत करून पिडीतेला डांबून ठेवले, मारहाण केली.

हा प्रकार 13 जुलै 2021 ते 12 जून 2022 या काळात घडला असून रावेर पोलिसात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा यासह भादवी कलम 366,328,342,376(न),323,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर भाग पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या