धुळे – प्रतिनिधी dhule
शिरपूर (shirpur) तालुक्यातील अनेर गावात छापा टाकत नाशिक (nashik) परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने स्फोटक असलेल्या जिलेटीनच्या काड्या आणि इलेक्ट्रीक डेकोनेटरचा साठा जप्त केला. तसेच एकाला ताब्यात घेतले.
याप्रकरणी थाळनेर (Thalner) पोलिसात (police) दोन जणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनेर गावात डॅमजवळील वस्तीत काहींनी मानवी जिवितास धोका होईल, असा जिलेटीन आणि इलेक्ट्रीक डेकानेटरचा विनापरवाना व बेकायदेशीर रित्या साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती.
त्यानुसार एएसआय बशीर तडवी यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास छापा कारवाई केली. तेथून सनी भामरे (रा.महादेव दोंदवाड, हिसाळे ता. शिरपूर) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून धनादाळ लिहिलेल्या पिशवीतून 4 हजार 650 रूपये किंमतीच्या 93 काड्या व स्फोट करण्यासाठी वापरण्यात येणारे तीन इलेक्ट्रीक डेकोनेटर त्यात दोन वापरलेले व एक चालुस्थितीत व एक 4 हजारांचा मोबाईल असा एकुण 7 हजार 750 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भामरेसह योगेश नामक व्यक्तीवर थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.