Saturday, May 25, 2024
Homeनाशिकमहिला पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

महिला पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील हातभट्ट्या निर्मूलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. महिला पोलिसांचे पथक यासाठी धडाकेबाज कारवाई करीत आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नुकतेच पथकाने नाशिक ग्रामीण हद्दीतील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेडभैरव, देवाचीवाडी, पिंपळगाव घाडगा, चिंचलेखैरे, देवळे, तळेगाव अशा दुर्गम ठिकाणी छापा मारुन गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत एकूण 1 लाख 58 हजार रुपये किंमतीची हातभट्टीची दारू व रसायन जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चालविणार्‍यांवर इगतपुरी, घोटी, वाडीवर्‍हे व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व उत्पादनाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे.

या दरम्यान पोलिसांनी जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणी चालणार्‍या अवैध हातभट्टी व्यवसायांची ठिकाणे उद्ध्वस्त केली आहे. त्याचप्रमाणे अशा हातभट्ट्यांना कच्चामाल पुरवणार्‍या पुरवठादारांवर देखील मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील हातभट्ट्यांची ठिकाणे व अवैध दारूची विक्रीची ठिकाणे नेस्तनाबूत करण्यासाठी आता नाशिक ग्रामीण महिला पोलीस अंमलदारांची 4 विशेष पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात 8 महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे पथकांच्या कामगिरीवर देखरेख करत आहेत.

महिला पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या धडक कारवाईस जिल्ह्यातील पोलीस पाटील व नागरिकांनी सहकार्य करावे.

– शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या