पुनदखोरे । वार्ताहर
117 कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघासाठी उद्या 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. कळवण सुरगाणा. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी मतदान दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत शांततेत पार पडले यात कळवण सुरगाणा मतदारसंघात 78.43 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. या मतदारसंघाची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा कळवण – नाशिक मार्गावर होणार आहे.
हे देखील वाचा – संपादकीय : २२ नोव्हेंबर २०२४ – निरंतर लोकशिक्षण आवश्यक
त्यामध्ये एकूण वीस टेबलावर एकूण 25 फेऱ्या मतमोजणीसाठी होणार आहेत. त्यापैकी 14 टेबल बूथ साठी असतील तर पाच टेबल पोस्टल मतदानासाठी आणि एक टेबल सैनिक मतदानासाठी असणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ७० कर्मचारी 4 ए.आर. ओ.तसेंच एक निवडणूक निरीक्षक असणार आहे. मतमोजणी कक्ष परिसरात पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यांचप्रमाणे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणी पासेस वितरण केले जाणार आहेत. पास शिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
हे देखील वाचा Vinod Tawade: ‘बिनशर्त माफी मागा अन्यथा’…; विनोद तावडेंनी पाठवली राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, सुप्रिया सुळेंना कायदेशीर नोटीस
मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. सदर मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पत्रकार बांधवांसाठी मतमोजणी केंद्राबाहेर मीडिया कक्ष तयार करण्यात आलेला आहे. फेरनिहाय मतमोजणीची आकडेवारी मीडिया कक्षामध्ये पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे देखील वाचा Maharashtra Assembly Election 2024 : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
वरील प्रमाणे प्रशासनाकडून कळवण सुरगाणा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अकुनुरी नरेश व रोहिदास वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा