Monday, April 28, 2025
Homeधुळेसमजविल्याचा राग, पित्याच्या कानाचा घेतला चावा

समजविल्याचा राग, पित्याच्या कानाचा घेतला चावा

धुळे । dhule प्रतिनिधी

आईशी जोराने बोलणार्‍या मुलास समजविणार्‍या (Explain to the child) पित्यालाच (father) मुलाने (child) कानाला चावा घेत (bite the ear) जखमी (wounded) केले. ही घटना शुक्रवारी शहरातील जुने धुळे भागात घडली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत दीपक वामन फुलपगारे (वय 54 ग़.नं.13, खूनी गणपती मंदिराजवळ, जुने धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.14 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलगा प्रतिश दीपक फुलपगारे (वय21) हा कटींग करुन घरी आला.

तेव्हा त्याने त्याच्यासाठी गरम पाणी न ठेवल्याने तो त्याच्या आईशी जोराने बोलु लागला. त्यावेळी दीपक फुलपगारे हे मुलगा प्रतिशला समजविण्यास गेले तसेच त्यास पकडले. तेव्हा त्याने वडिलांच्या कानाला चावा घेत जखमी केले. त्यानुसार प्रतिश फुलपगारेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...