मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली असून मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपत असली तरी निवडणूक नियमानुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या मतदाराला मतदान करता येते. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर अनेक मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे राज्यात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात ५८. २२ टक्के मतदान झाले. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्वपक्षीय दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. त्यामुळे राज्यातील मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला याची उत्सुकता ताणली गेली असून आता सर्वांना नजरा २३ नोव्हेंबरच्या मतमोजणीची आणि निकालाकडे लागले आहे.
अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर दुपारी काही मतदारसंघात शुकशुकाट होता. मात्र, संध्याकाळी चार वाजल्यानंतर मतदार मतदानासाठी पुन्हा घराबाहेर पडल्याचे चित्र दिसले. ग्रामीण भागात काही मतदान केंद्रावर मतदारांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून मतदानावर बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे.
राजकीय नेते, उमेदवार, सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह उद्योग, बॉलिवूड, क्रीडा आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडले. अभिनेता सलमान खानने वांद्रे येथे मतदान केले. सकाळी मतदान केल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सकाळपासून मतदारसंघात फिरून मतदानाचा आढावा घेतला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
शिवसेना शिंदे गट : एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड,शंभूराज देसाई
भाजप: देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा
राष्ट्रवादी अजित पवार गट : अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, नवाब मलिक
काँग्रेस : पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार
शिवसेना उद्धव ठाकरे गट ; आदित्य ठाकरे, अजय चौधरी, वैभव नाईक, सुनील प्रभू
राष्ट्रवादी शरद पवार गट : जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, युगेंद्र पवार, रोहित पाटील
संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
अहमदनगर – ६१.९५टक्के,
अकोला – ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड – ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे – ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली – ६१.१८ टक्के,
जळगाव – ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर – ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर – ५६.०६ टक्के,
नांदेड – ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे – ५४.०९ टक्के,
रायगड – ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली – ६३.२८ टक्के,
सातारा – ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे – ४९.७६ टक्के,
वर्धा – ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ – ६१.२२ टक्के
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा